पेशावर : पाकिस्तानच्या अशांत अशा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील गजबजलेल्या बाजारात मदरशाजवळ शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्पोटात जवळपास २५ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ हून अधिक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कबीलाई जिल्ह्यातील कलाया भागातील जुमा बाजारात हा शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जियो न्यूजनं जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटातील मृतांची संख्या २५ पेक्षा जास्त आहे... मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांमध्ये शिया मुसलमानांची संख्या जास्त आहे. सुरक्षा दलानं या भागाला घेरलंय... तसंच बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय. 


कराचीत चीनी दूतावासाजवळ स्फोट 


दुसरीकडे, कराची शहरात चीनी दूतावासजवळ झालेल्या स्फोटात ३ दहशतवादी आणि दोन पोलीस ठार झालेत. हल्लेखोर चीनी दूतावासावर हल्ला करण्यात आला होता. चीनी दुतावासवरील सुरक्षा रक्षकांनी प्रत्तुतर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यात ३ दहशतवादी आणि २ पोलीस ठार झालेत.  कराचीतला अतिसुरक्षित परिसर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्लिफटन परिसरात हा हल्ला झालाय. याच परिसरात भारताला अनेक गुन्ह्यासाठी हवा असणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमही गेली अनेक वर्ष दडून बसल्याचा गुप्तचर संस्थांचा दावा आहे.