मुंबई: महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. स्वयंपाक घरात लागणाऱ्या अगदी छोट्य़ा गोष्टींपासून ते नॉनव्हेजपर्यंत सर्व गोष्टींचे दर अगदी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर भडकत आहेत. तर दुसरीकडे स्वयंपाक घरातील वस्तू महाग झाल्यानं नागरिकांना मोठा फटका बसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली असून नागरिक त्रासले आहेत. चिकन आणि अंड्याच्या किंमती अचानक वाढल्यानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहेत. पाकिस्तानमध्ये आल्याचे दर 1000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे 8 ते 10 रुपयांना मिळणारं अंड 30 रुपयांवर पोहोचलं आहे. एक किलो आल्याची किंमत 1000 तर अंड्यासाठी डझनाला 350 रुपये मोजावे लागत आहेत. 


ट्रकच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, ग्रामस्थांचं रास्तारोको


ही परिस्थिती आजचं आहे का? तर नाही गेल्या कित्येक दिवसांपासून पाकिस्तानवर अशी परिस्थिती ओढवली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आता किंमती वाढल्यामुळे उत्पादक आणि व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. या किंमती वाढल्यानं कच्च्या मालाची आणि चाराच्या किंमतीत आश्चर्यकारक वाढ नोंदवण्यात आली. अनेक व्यापारी आणि विक्रेते बाहेरच्या देशातून कच्चा माल आयात करण्याच्या विचारात आहेत. 


दुसरीकडे सर्वच गोष्टी महाग झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे इमरान खान साखरेचे दर 102 रुपयांवरुन 81 रुपये केल्याचं श्रेय घेत स्वतःच्या सरकारचं कौतुक करण्यात गुंग आहेत. त्यामुळे अशा स्थितीत सर्वसामान्यांना दिलासा कसा मिळणार हाच प्रश्न आहे.