इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती आरिफ अल्वी (Pakistan President Arif Alvi) यांनी संसद बरखास्त केली आहे. तत्पूर्वी, नॅशनल असेंब्लीचे (एनए) उपसभापती कासिम सूरी यांनी पंतप्रधानांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला. दुसरीकडे, विरोधी सदस्यांनी कनिष्ठ सभागृह बरखास्त करणे असंवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राजकीय संकटाच्या काळात पाकिस्तानमध्ये शब्दयुद्ध सुरूच आहे. आम्ही इम्रान खान यांचे सरकार पाडले, असा दावा पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी केला. मात्र, आताही पाकिस्तान सरकारच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे की इम्रान खानच पंतप्रधान राहतील.


विरोधी पक्षांचे नेते सर्वोच्च न्यायालयात


इम्रान खान यांच्या विरोधात सध्या १९७ सदस्य आहेत. मात्र, विरोधकांनी अविश्वास ठराव फेटाळणे घटनाबाह्य ठरवत या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी सुनावणीसाठी सरन्यायाधीश न्यायालयात पोहोचले आहेत. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी स्वतःहून दखल घेतल्याचेही बोलले जात आहे.