पाकिस्तानला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची भीती
पाकिस्तानला भरली सर्जिकल स्ट्राईकची धडकी
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी उरी सेक्टरमध्ये १८ सप्टेंबर २०१६ ला हल्ला केला होता. ज्यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर 11 दिवसातच म्हणजेच २९ सप्टेंबर २०१६ ला भारतीय जवानांनी पीओकेमध्ये तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. यानंतर संपूर्ण जगाने भारताच्या या धाडसाचं कौतूक केलं होतं. संपूर्ण जगामध्ये यानंतर एकच चर्चा सुरु झाली आहे. पण पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची चर्चा सुरु झाली आहे.
पाकिस्तानला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची भीती सतावते आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतात असं वक्तव्य पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे शेख रशिद यांनी लाहोरमध्ये एका कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा याची चर्चा रंगली आहे.