अमेरिकेची दादागिरी पाकिस्तानवर चालणार नाही - इमरान खान
भारत-अमेरिकेदरम्यान 6 सप्टेंबरपासून चर्चा सुरू होणार आहे
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इमरान खान अॅक्शनमध्ये आलेत. ट्रम्प सरकारचा एकतर्फी आणि मनमानी पद्धतीच्या एकतर्फी मागण्या पाकिस्तानात मान्य केल्या जाणार नाहीत, असं इमरान खान यांनी म्हटलंय. अमेरिकन परदेश मंत्री पाइक पोम्पिओ यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी पाकिस्तानी मीडियानं हा दावा केलाय.
'एक्सप्रेस ट्रिब्युन'नं दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या एका पत्रकार परिषदेत इमरान खान यांनी, परस्पर सन्मानाच्या आधारावर अमेरिकेसोबत द्विपक्षीय संबंधांना चालना मिळण्याची आपल्या नीतीचा पुनरुच्चार केलाय.
महत्त्वाचं म्हणजे, भारत-अमेरिकेदरम्यान 6 सप्टेंबरपासून चर्चा सुरू होणार आहे. या बैठकीपूर्वी माइक पोम्पिओ 5 सप्टेंबर रोजी पाकिस्तान जाणार आहेत.
इमरान खान पुढच्या महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेलाही उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात येतंय. दुसऱ्या कामात व्यस्त असल्यानं आपण या महासभेत अनुपस्थित असल्याचं इमरान यांनी म्हटलंय. त्यांच्याजागी परदेश मंत्री शाह महमूद कुरैशी 73 व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्राला उपस्थित राहतील.