नवी दिल्ली : इम्रान खानचा 'नवा पाकिस्तान' भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे अजूनही दहशतीत आहे. त्यामुळेच त्यांनी पाकिस्तानी सैन्याला अलर्ट केलं आहे. भारत आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती पाकिस्तानला आहे. याचा खुलासा इतर कुणी नसून पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. जिओ न्यूजने पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, 'भारत पुन्हा एकदा पाकिस्तानविरूद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी करत आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सैन्याने यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानच्या खोडसाळ प्रतिक्रियांना प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही याबाबत भीती आहे. यामुळे इम्रान खानने आपल्या सेन्याला हाय अलर्टवर ठेवले आहे.


अहवालात म्हटले आहे की, लडाख आणि डोकलाममधील अडचणीनंतर भारत नियंत्रण रेषेवर (एलओसी) आणि भारत-पाकिस्तान सीमेवर हल्ल्याची तयारी करत आहे. हल्ल्याच्या शक्यतेमुळे पाकिस्तानच्या सशस्त्र दलाला उच्च सतर्क करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय देशांतील लोकांचे लक्ष शेतकरी आंदोलन आणि इतर मुद्द्यांपासून हटवण्यासाठी भारत सर्जिकल स्ट्राईक किंवा इतर कारवाई करु शकतो. असं पाकिस्तानने म्हटलं आहे. 


२०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. असाच प्रयत्न 26 फेब्रुवारी 2019 रोजीही करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमधील उरी लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर भारतीय सैन्याने पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ल्याद्वारे दहशतवादी तळे उद्धवस्त करुन पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना कडक शब्दात उत्तर दिले होते.