आज सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कतृत्वाची मोहोर उमटवली आहे. मग ते सिनेमा असो किंवा राजकारण. सिनेसृष्टीत ट्रेंड्री आणि स्टायलिश राहणं जितकं महत्वाचं आहे त्याउलट राजकारणात साधा पेहराव ठेवला जातो..राजकारणात पुरुषांसाठी पांढरा कुर्ता-पायजमा आणि महिलांसाठी साडी असाच पोषाख समोर येतो. मात्र पाकिस्तानच्या एका महिला मंत्र्याने या सर्वांना बगल दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पाकिस्तानात नव्याने बनलेल्या शरीफ सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान होणाऱ्या हिना रब्बानी खार पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. हिना रब्बानी या त्यांच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. लाखोंची पर्स, ट्रेंडी ज्वेलरी, लाईनर, लिपस्टिक असा स्टायलिश लूकमुळे त्या अभिनेत्रींना टक्कर देतात.



हिना रब्बानी या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रिपद सांभाळणार आहेत. कमी वयात याच खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या पाकिस्तानी महिला आहेत. यापूर्वी परराष्ट्र मंत्री असताना त्या भारत दौऱ्यावर असताना त्यांच्या लूकची बरीच चर्चा झाली होती.



हिना रब्बानी यांना पाकिस्तानात स्टाईल आयकॉन मानलं जातं. त्यांचा फॅशन सेन्स आणि लूक हा अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाही. महागड्या बँडच्या ऍक्सेसरीज वापरणं त्यांना आवडतं.



डोक्यावर दुपट्टा, गळ्यात मोत्याची माळ असा साधा पण ट्रेंडी लूकमध्ये त्या स्वतःला कॅरी करतात.
 



भारत दौऱ्यावेळी त्यांच्या हातातील 7 लाखांच्या पर्सची खूप चर्चा झाली होती.  Louis Vuitton, Ferragamo, Prada सारख्या महागड्या ब्रँडच्या पर्स त्यांना आवडतात..बोल्ड लाईनर आणि लाईट पिंक लिपस्टिक लावणंही त्यांना आवडतं.


हिना रब्बानी यांनी त्यांच्या राहणीमानामुळे राजकारणातील पेहरावाची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांच्या लूकचे जगभरात चाहते आहेत.