मुंबई : बजरंगी भाईजान या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीने पाकिस्तानी रिपोर्टरचं पात्र साकारलं होतं. या पात्राची जोरदार चर्चा रंगली. सिनेमांतील अनेक गोष्टी या काल्पनिक असतात मात्र नवाजुद्दीन साकारलेली ही भूमिका काल्पनिक नसून खरीच अशी एक व्यक्ती असल्याचं सांगितलं गेलं. पाकिस्तानचा रिपोर्टर चांद नवाब मलिक याचा आणखी एक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ चांद नवाब रिपोर्टिंग करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत अनेक वाक्य चांद नवाब विसरताना दिसत आहे. अनेक कट घेत हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 1.46 मिनिटाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तानचा हा रिपोर्टर या अगोदर देखील आपल्या रिपोर्टिंगमुळे चर्चेत राहिलेला आहे. 


आताच्या व्हिडिओत चांद नवाब कराचीत एका पानासंदर्भात रिपोर्टिंग करत आहे. यामध्ये आपण पाहतोय की, चांद नवाब आपल रिपोर्टिंग पूर्ण करू शकत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रिपोर्टिंग करताना चांद नवाब अनेकदा लाईन विसरत आहे. 



या अगोदर चांद नवाब यांनी ईदच्या दिवशी केलेलं रिपोर्टिंग देखील व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला जात आहे. या व्हिडिओत रिपोर्टिंग करताना चांद नवाब यांना तेथील प्रवाशांमुळे त्रास होत असतानाच आपण पाहिलं आहे. चांद नवाब इतके हैराण झाले की त्यांना अनेक रिटेक करावे लागले.