पाकिस्तानात निवडणुकीत लष्कराची मनमानी, महिलांना मतदानापासून रोखले
अनेक ठिकाणी महिलांनी आरोप केलाय, मतदान केंद्रावर जाण्यास महिलांना रोखले जात आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.
लोहोर : पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लष्कराची मदत घेण्यात आलेय. दरम्यान, महिलांना मतदानापासून रोखण्यात आले आहे, असा काही महिलांनी आरोप केलाय. अनेक केंद्रावर महिलाना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. लष्कराच्या जवानांनी रोखल्यापासून मतदानापासून महिलांना वंचित राहावे लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मदतान करता आले नाही, असे महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.
पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला विजयी करण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यासाठी लष्कराचे जवान असे करत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाला जिंकण्यासाठी सर्वकाही चालले आहे, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी यांना तरुंगात कैद करण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानातील ११ व्या सार्वजनिक निवडणुकीसाठी ७० वर्षानंतर पाकिस्तानात पंजाब शहरातील खुहाब गांवात पहिलांदा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याआधी या गावातील महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आलेला नव्हता.
पाकिस्तानात कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरु असताना भीषण बॉम्बस्फोट झालाय. क्वेटा येथे मतदानादरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. क्वेटामधील पूर्वकेडील बायपासजवळ हा स्फोट घडवण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.