Digital Detox : फेसबुकची मूळ कंपनी Meta विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्याच्या मते, त्यांची मुलगी इंस्टाग्रामच्या वापरामुळे डिप्रेशन आणि एंजायटीची शिकार झालीये. त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. काय आहे नेमक प्रकरण ? ते जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जगाला वेड लावलंय. विशेषतः तरुणाईच्या आयुष्यात सोशल मीडियाला महत्त्वाचं स्थान आहे. मागील दशकात, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग झालाय.


या प्लॅटफॉर्मचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. लोकांना एकमेकांच्याशी जोडण्याचा हेतू असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता लोकांना एकमेकांपासून दूर नेत आहेत.
या प्लॅटफॉर्मच्या वापराने अनेक लोक डिप्रेशन आणि एंजायटीला बळी पडत आहेत. असचं एक प्रकरण अमेरिकेत पाहायला मिळालं.


Meta वर गुन्हा का?


अमेरिकेत एका मुलीच्या पालकांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी Meta च्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मुलीच्या पालकांच्या मते, इंस्टाग्राम वापराच्या 'सवयी'मुळे त्यांच्या मुलीला ईटिंग डिसऑर्डर आणि आत्महत्येचा विचार यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतंय.


कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात, मेटाने इंटरनल रिसर्च पेपर चा उल्लेख केला होता, ते पेपर्स लीक झाले होते. इंस्टाग्रामच्या लीक झालेल्या पेपर्समध्ये युजर्सच्या वागणुकीसंदर्भात काही सर्वेक्षण करण्यात आलं होतं.


नोंद झालेल्या प्रकरणात असं म्हटलंय की मुलीने वयाच्या 11 व्या वर्षी तिच्या पालकांना माहिती न होऊ देता तिने एक Instagram अकाउंट बनवलं होतं, पण Instagram वर अकाउंट तयार करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचं वय हे किमान 13 वर्षे असणं आवश्यक आहे. इंस्टाग्रामच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनमुळे त्यांच्या मुलीला Instagram चं व्यसन लागलं असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे.