इतक्या किंमतीत जगातील सर्वात महागड्या घडाळ्याची विक्री
२ अब्जाहूनही घडाळ्याची किंमत अधिक आहे.
नवी दिल्ली : आपण आतापर्यंत अनेक महागड्या घडाळ्यांबाबत ऐकलं असेल. पण एका ब्रँडच्या घडाळ्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. स्विस लक्झरी ब्रँड पॅतेक फिलिपेने (patek philippe) त्यांचं एक घड्याळ लिलावात ३१ दशलक्ष डॉलर्सला विकलं आहे. भारतीय रुपयांत याची किंमत २ अब्ज २३ कोटी ७५ लाख ५ हजार ५० रुपये इतकी आहे. (२,२३,७५,५,५०)
शनिवारी जिनेव्हा येथे झालेल्या लिलावासाठी हे तयार करण्यात आलं होतं. 'डचेने मस्क्यूलर डिस्ट्रॉफी' नावाच्या आजाराच्या संशोधनासाठी, पैसे गोळा करण्यासाठी हे विशेष तयार केलं होतं.
स्टेनलेस स्टीलमध्ये तयार केलेल्या घड्याळाची ती एकमेव आवृत्ती आहे. अलार्म सब-डायल एका विशिष्ट शिलालेखने चिन्हांकित केला आहे.
घड्याळात काळ्या आणि गुलाबी रंगाची पलटणणारी केस लावण्यात आली आहे. १८ कॅरेटची सोन्याची डायल प्लेट लावण्यात आली आहे.
शनिवारी ३१ दशलक्ष डॉलर्समध्ये एका व्यक्तीने हे घड्याळ खरेदी केलं. याआधीदेखील पॅतेक फिलिपे ब्रँडच्या घडाळ्याने १९३२ मध्ये रेकॉर्ड केला होता. २०१४ मध्ये लिलावात एकाने ते घड्याळ २३.२ मिलियन स्विस फ्रँकमध्ये खरेदी केलं होतं.