Brain Tumor Surgery Patient Plays Saxophone : आजच्या विज्ञान युगात काहीही अशक्य नाही. जगभरात अशा गोष्टी घडत असतात ज्यावर आपण कधीच विश्वास ठेवू शकतं नाही. सध्या सोशल मीडियावर (Social media) असाच एक व्हिडीओ (Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. डोळ्यासमोर मृत्यू असल्यास आपण घाबरतो, अंगावर काटा येतो, अगदी आपल्याला काहीही सुचतं नाही. अशात हा व्हिडीओ त्या प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे. 


आश्चर्यकारक व्हिडीओ (Amazing video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका संगीतकाराला (Musician) ब्रेन ट्युमर (Brain Tumor ) झाला. आता ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. संगीतकाराचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आता या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान (Surgery)  रुग्ण (patient) जागा राहिला पाहिजे होता. मग काय या रुग्णाने डॉक्टरांसोबत (Doctor) सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. (patient plays saxophone during brain surgery Video Viral on Social media nmp)


हा करिश्मा कधी पाहिला आहे का?


संगीतकार शेवटी संगीतकार असतो, अंत्यत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने जागे राहण्यासाठी सॅक्सोफोन (Saxophone)वाजले. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान हा रुग्ण 9 तास सॅक्सोफोन वाजवत होता. हा शस्त्रक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral on Social media) होतो आहे. 


कोण आहे हा रुग्ण आणि कुठे घडला हा चमत्कार?


इटलीची (Italy) राजधानी रोममध्ये (Rome) ही आश्चर्यकारक शस्त्रक्रिया करण्यात आली. जीझेड असं या रुग्णाचं नाव असून 35 वर्षीय संगीतकार आहे. रुग्णाने 1970 च्या लव्ह स्टोरी चित्रपटाचे थीम गाणे आणि इटालियन राष्ट्रगीत वाजवले. 



शस्त्रक्रियेत संगीताची झाली मदत 


डॉक्टर म्हणाले की, 'एखादे वाद्य वाजवणे म्हणजे तुम्हाला संगीत समजू शकते, जे उच्च संज्ञानात्मक कार्य आहे. याचा अर्थ तुम्ही उपकरणांशी संवाद साधू शकता, तुम्ही दोन्ही हातांचे समन्वय साधू शकता, तुम्ही स्मरणशक्तीचा व्यायाम करू शकता, तुम्ही मोजू शकता... कारण संगीत हे गणित आहे ..तुम्ही दृष्टी तपासू शकता कारण रुग्णाला उपकरणे पाहायची आहेत, आणि तुम्ही रुग्णाच्या मार्गाची चाचणी घेऊ शकता.'