Blood Group : मीच हुशार, मीच शहाणा आहे मीच बुद्धीमान आहे, असं अनेकांना वाटतं. पण त्याची हुशारी आणि बुद्धी ही त्याच्या कामातून आणि कतृत्वातून झळकते. पण असे अनेक जण असतात हे हुशार आणि बुद्धिमान असतात पण आपली ही बाजू कोणाला कळू देत नाही. पण तुमचं हे गुपित मात्र तुमचं ब्लड ग्रपुमधूनही जगाला कळू शकतं. काय ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात याबद्दल एक संशोधन करण्यात आलं त्यातून त्यांनी असा दावा केला आहे की, तुमचं ब्लड ग्रपु काय आहे यातून तुमची हुशारी समजते. मग चला तर जाणून घेऊयात कोणते व्यक्ती हे स्मार्ट असतात. (people of this blood group are very smart trending news )


'या' रक्तगटाची व्यक्ती असतात अतिशय हुशार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विद्यापीठाच्या संशोधनात असं सिद्ध झालं आहे की, 'बी पॉझिटिव्ह रक्तगट'  (B positive blood group) असलेल्या व्यक्तींचे मेंदू हे सर्वात वेगवान असतात. ही लोक इतर लोकांपेक्षा चांगल्या विचारशक्तीची असतात. बी पॉझिटिव्ह रक्तगटाची व्यक्तीच्या मेंदूमध्ये पेरिटोनियल आणि टेम्पोरल लोबचे सेरेब्रम हे सर्वात अधिक सक्रिय असतात. त्यामुळे या व्यक्तीची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि मेंदू अतिशय सक्रिय असतो. 


 'बी पॉझिटिव्ह रक्तगट' नंतर या रक्तगटाच्या व्यक्ती असतात हुशार 


'बी पॉझिटिव्ह रक्तगट' नंतर O+ ब्लड ग्रुप असलेले व्यक्ती हुशार असतात. या लोकांचं मनं खूप तेज असतं. या व्यक्तीची खासियत म्हणजे यांच्या शरीरात रक्ताभिसरण इतरांपेक्षा चांगल असतं. त्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह हा चांगला होतो. याचा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होता. याची स्मरणशक्ती खूप चांगली असते. 


संशोधन काय सिद्ध झालं ?


कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांकडून रक्तगटाच्या संदर्भात एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये सर्व रक्तगटांच्या 69 लोकांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर या लोकांच्या ब्लड ग्रुपचे नमुने घेण्यात आली ज्यावर हे संशोधन करण्यात आलं.  त्याशिवाय मानवी मेंदूबाबत माहिती गोळा करण्यात आली होती. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर असं दिसून आलं की, 'बी पॉझिटिव्ह' आणि 'ओ पॉझिटिव्ह' रक्तगटाच्या लोकांचा मेंदू इतरांपेक्षा तेज असतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)