अमेरिका : मृत्यू हा व्यक्तीच्या हातात नसतो. मृत्यू हा सांगून येत नाही. मात्र एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती मृत्यू जवळ असताना नेमका कोणता विचार करते? याचं उत्तर एका नर्सने दिलं आहे. ही नर्स अशा एका रूग्णालयात काम करते, जिथे दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांना ठेवलं जातं. यामध्ये कॅन्सरच्या अंतिम स्टेजच्या रूग्णांचा समावेश असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द सनच्या रिपोर्टनुसार, या नर्सचं नाव ज्यूली आहे. ही नर्स अमेरिकेत राहायला आहे. ज्यूलीने तिच्या अनुभवावरून सांगितलंय की, अधिकतर लोकांना मृत्यू जवळ असल्यावर एकाच गोष्टीचा पश्चात्ताप असतो. यासंदर्भात ज्यूली यांनी टिकटॉकवर एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. 


ज्यूलीच्या म्हणण्याप्रमाणे, मृत्यू जवळ आल्यावर व्यक्तींना 4 प्रमुख गोष्टींचा पश्चात्ताप होतो. यामध्ये-


  • अधिकतर लोकांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर जीवनात आरोग्याची काळजी न घेण्याचा पश्चात्ताप होतो. 

  • जीवनात छोट्या छोट्या आनंदांकडे लक्ष दिलं नाही याचा.

  • संपूर्ण जीवन केवळ काम केलं याचा

  • आणि कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतित करता आला नाही याचा पश्चात्ताप व्यक्तींना होतो.


रूग्णांशी बोलल्यानंतर ज्यूलीने सांगितलं की, आपल्यासा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. त्याचसोबत आपल्या जीवनात आपण दयाळू राहिलं पाहिजे. याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत कधीही हलगर्जीपणा करू नये. 


तुमचं संपूर्ण जीवन केवळ कामात घालवू नका. तुमच्या जवळ ज्या व्यक्ती आहेत, तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे, अशा लोकांसोबत वेळ घालवा. गरजेचं नाही की, हे व्यक्ती कुटुंबातील असतील, असंही ज्यूलीने सांगितलं आहे.