नवी दिल्ली : महिनाभरापुर्वी ट्विटरने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले होते. त्यानंतर पुर्ण अमेरिकेची धुरा सांभाळणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर हँडल कोणी बंद केलं ? कोणाची इतकी हिंमत झाली ? अशा चर्चांना उधाण आले होते. प्रसारमाध्यमांनी तर हे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नव्हते. पण महीन्याभरानंतर सत्य उलघडले आहे आणि ती व्यक्ती देखील जगासमोर आली आहे. 


कोण आहे तो ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो जर्मन नागरिक असून त्याचं नाव बहतीयार ड्युसक आहे. हा इसम मुळचा तुर्कीचा आहे. ट्विटरच्या ट्रस्ट अँड सेफ्टी विभागात तो काम करत होता. 


का केलं असं ?


टेक क्रंचला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ट्विटरवर येणाऱ्या आक्षेपार्ह कॉमेंट, अनधिकृत ट्विट, गैरवर्तन करणारे अकाऊंट ज्यांच्याबद्दल ट्विटरकडे तक्रार करण्यात आली आहेत त्या तक्रारींची नोंद घेऊन त्या डिलीट करणं हे त्याचं काम होतं. नेहमीप्रमाणे काम करताना आक्षेपार्ह अकाऊंट म्हणून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव समोर आलं. तसा रिपोर्ट ट्विटरकडे आला. त्यामुळे ट्विटरच्या पॉलिसीप्रमाणे त्याने ते अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं. मी नेहमीप्रमाणे माझं काम करत होतो. अनावधानानं ही चुक झाली, असेही तो म्हणाला.