मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांना हैराण केलंय. पेट्र्रोल - डिझेलच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी आणि ट्रान्सपोर्टच्या अडचणी वाढल्यात. मुंबईमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 84.70 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीमध्ये 76.87, भोपाळमध्ये 82.47, बिहारमध्ये 82.35 रुपये प्रती लिटर पेट्रोलचा दर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम भारतावरच होतोय की भारताचा शेजारील देशांवरही याचा परिणाम होतोय... हे पाहण्यासाठी पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या देशांतील सध्याचा पेट्रोल दर काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.


नेपाळमधले पेट्रोल-डिझेलचे दर


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारताचं शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये भारतापेक्षा पेट्रोल - डिझेलच्या किंमती जास्त आहेत. नेपाळमध्ये सध्या (22 मे) पेट्रोल 108.50 नेपाळी रुपये प्रती लीटर तर डिझेल 90.50 नेपाळी रुपये प्रती लीटर दराने आहे. 


बांग्लादेशात डिझेल-पेट्रोलचे दर


तर, भारताचा दुसरा शेजारी देश बांग्लादेशमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर भारताच्या तुलनेत जास्तच आहेत. उल्लेखनीय म्हणजे, बांग्लादेशात गेल्या दोन वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत. बांग्लादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, पेट्रोल - डिझेलच्या दरांत शेवटचा बदल 24 एप्रिल 2016 मध्ये करण्यात आला होता. 


सध्या (22 मे) बांग्लादेशात पेट्रोल 89.00 टका प्रती लीटर (हायऑक्टेन), 86.00 टका प्रती लीटर (सामान्य पेट्रोल) तर 65.00 टका प्रती लीटर दराने डिझेल विकत घ्यावं लागतंय. 


श्रीलंकेत पेट्रोल-डिझेलचे दर


सिलॉन पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटच्या माहितीनुसार, श्रीलंकेत पेट्रोलचे दर 130 रुपयांहून जास्त आहेत. सध्याच्या दरानुसार, श्रीलंकेत पेट्रोल (92 ऑक्टेन) 137 श्रीलंकन रुपये प्रती लीटर, पेट्रोल (95 ऑक्टेन) 148 श्रीलंकन रुपये प्रती लीटर आहे. 


पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर


पाकिस्तानमध्ये पेट्रोल 87.70 पाकिस्तानी रुपये प्रती लीटर तर डीझेल 98.76 पाकिस्तानी रुपये प्रती लीटर दराने विकलं जातंय.