भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य सातासमुद्र, पोलंडच्या ग्रंथालयात कोरले उपनिषदाचे श्लोक
शल मीडियावर (Social Media) एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात पोलंडमधील लायब्ररीच्या भिंतीवर उपनिषदेचे श्लोक लिहिलेले दिसत आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात पोलंडमधील लायब्ररीच्या भिंतीवर उपनिषदेचे श्लोक लिहिलेले दिसत आहेत. पोलंडमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर University of Warsaw च्या ग्रंथालयाच्या भिंतीवर हिंदू तत्त्वज्ञानाच्या वैदिक संस्कृत मजकुराचे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले, 'किती सुंदर दृश्य'. (Photo of upanishad mantras engraved on university of warsaw library- wall in poland goes viral)
'हिंदू धर्माचा पाया'
पोलंडमधील भारतीय दूतावासाच्या (Indian Embassy in Poland) अधिकृत हँडलमध्ये पुढे लिहिले आहे, 'University of Warsawच्या ग्रंथालयाची ही एक भिंत आहे, ज्यावर उपनिषदेचे छंद कोरलेले आहेत. उपनिषद हे हिंदू तत्त्वज्ञानाचे वैदिक संस्कृत ग्रंथ आहेत, जे हिंदू धर्माचा आधार बनतात.
भारतीयांसाठी अभिमान
University of Warsawचे हा फोटो भारतीयांना अभिमानास्पद वाटत आहे. सर्व यूजर्स हा फोटो शेअर करत आहेत. प्रश्न विचारत आहेत की 'जेव्हा जग हिंदू धर्म स्वीकारत आहे, तेव्हा आपण भारतीय पाश्चात्य सभ्यतेकडे आकर्षित होत आहोत.' खरं तर, उपनिषद हे हिंदू धर्माचे सर्वात जुने शास्त्र आहेत. उपनिषदे सामान्यतः वेदांत म्हणून ओळखली जातात.