नवी दिल्ली : सियोलमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील सर्वात मोठा शांती पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात आला आहे. जगभरातील १ हजार हून अधिक जणांना मागे टाकत पंतप्रधानांना हा पुरस्कार मिळाला आहे. १९९० पासून सुर झालेला हा पुरस्कार आतापर्यंत १३ जणांना देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हा पुरस्कार मिळवणारे १४ वे व्यक्ती आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींना मिळालेला हा सन्मान नक्कीच मोठा आहे. कारण या पुरस्काराच्या स्पर्धेत एकूण १००० हून अधिक लोकं होती. सियोलच्या १२ सदस्यांची समितीने या पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींची निवड केली. या पुरस्कारासोबत २ लाख डॉलर देखील भेट करण्यात आले.


१९८८ मध्ये सियोल ओलिंपिकनंतर हा पुरस्कार सुरु झाला. १९९० पासून दर २ वर्षानंतर हा पुरस्कार दिला जातो. सियोल शांती पुरस्कार मिळालेले अनेक व्यक्ती आहेत ज्यांना नंतर नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे.