PM Modi Bangladesh Visit: बांग्लादेशच्या या क्रिकेटरकडून पंतप्रधान मोदींचं कौतूक
पंतप्रधान मोदी हे २ दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत.
ढाका : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना काळात पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर आहेत. सध्या पंतप्रधान मोदी बांगलादेश दौर्यावर आहेत. शुक्रवारी 26 मार्च रोजी ढाका येथे दाखल झालेले पंतप्रधान मोदी शनिवारीही बांगलादेशातच असतील. भारतासाठी हा दोन दिवसांचा दौरा खूप महत्वाचा आहे. पीएम मोदी यांनी बांगलादेश संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची ही भेट घेतली, यावर शाकिबने मोदींचे आभार मानले.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसन म्हणाला की, "पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर खरोखरच सन्मान वाटतो. मला वाटते की त्यांची ही भेट दोन्ही देशांसाठी फलदायी ठरेल. भारतासाठी त्यांनी केलेलं नेतृत्व जबरदस्त आहे. मला आशा आहे की ते भविष्यात भारत आणि आमचे संबंध घट्ट करण्यात आणखी मदत करतील."
शाकिब अल हसन सध्या दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहे. एक वर्षाच्या बंदीनंतर त्याचे संघाच आगमन झाले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीजनमध्ये देखील तो खेळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 3 कोटी 20 लाखाला खरेदी केले आहे.
पंतप्रधान मोदींचं बांगलादेशमध्ये अशा प्रकारे स्वागत करण्यात आलं.