Donald Trump समर्थकांचा राडा; PM Modi यांच ट्विट
अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांची संसदेत घुसून तोडफोड
मुंबई : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी इलेक्टोरल कॉलेजबाबत होणाऱ्या बैठकीच्या अगोदर गुरूवारी कॅपिटल बिल्डिंगमध्ये राडा झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट केलं.
पंतप्रधान मोदींना या घटनेवर ट्विट केलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की,'वॉशिंग्टन डीसीमध्ये राडा आणि हिंसा याची माहिती मिळाल्यानंतर मी जास्त चिंतित आहे. सत्तेचं हस्तांहरण हे अतिशय क्रमबद्ध आणि शांतपूर्वक व्हायला हवं.'
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केलं ट्विट ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) ने ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की,'अमेरिकेत काँग्रेसची लज्जास्पद वागणूक. संयुक्त राज्य असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत जगभरात लोकतंत्रासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता हे महत्वपूर्ण आहे की हस्तांतरण हे अतिशय शांतिपूर्ण आणि व्यवस्थित पद्धतीने झालं पाहिजे.'
वॉशिंग्टनमधल्या कॅपिटल इमारतीत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी राडा केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. राड्यानंतर परिसरात संचारबंदी, ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आलं आहे.
काय आहे संपूर्ण वाद?
अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी ३ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणूक झाली. ज्यामध्ये डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांना ३०६ इलेक्टोरल कॉलेज वोट आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३२ मत मिळाली होती. निकाल असा असूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी पराजय स्विकारलेला नाही. याबाबत राज्यात ट्रम्प समर्थकांद्वारे केस देखील दाखल केली होती. मात्र कोर्टाने ते अर्ज फेटाळले आहेत.