नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह एकूण 58 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींच्या या नव्या मंत्रीमंडळात 25 कॅबिनेट, 9 स्वतंत्र कारभार आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली आहे. आज ते BIMSTEC देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशाचे प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी जगात तयार केलेली भारताची प्रतिमा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे इतर देशांनी देखील मोदींचं पुन्हा सत्तेत आल्याने स्वागत केलं. याचीच एक झलक युएईमध्ये देखील पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएईमधील भारताचे राजदूत नवदीप सुरी यांनी ट्विट करत म्हटलं की, खरी मैत्री. पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अबुधाबीमधील आयकॉनीक अॅडनॉक ग्रुपच्या इमारतीवर भारत आणि यूएईच्या झेंडा तसेच पंतप्रधान मोदी आणि शेख मोहम्मद बिन जायद यांचा फोटो दिसत होता.



ही इमारत 342 मीटर उंच आहे. या इमारतीत राष्ट्रील तेल कंपनी एडनॉकचं मुख्यालय आहे. ही जगातील 57 वी सर्वात उंच इमारत आहे.