नवी दिल्ली : कोरोना आता संपूर्ण जगात पसरला आहे. या महासंकटा दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ग्लोबल लीडरची भूमिका निभावली आहे. सततच्या अनेक देशांचे प्रमुख त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. शुक्रवारी देखील नेपाळ आणि जपानच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर माहिती दिली की, 'आज नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासोबत चर्चा केली, ज्यामध्ये कोरोना बाबत चर्चा झाली. नेपाळने या संकटाचा काळात जी हिंमत दाखवली आहे. भारत त्याचं कौतुक करतो. भारत या कठीण काळात नेपाळसोबत खंबीरपणे उभा आहे.'



त्याव्यतिरिक्त जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी देखील पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. या चर्चेत भारत-जपान मिळून कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी तंत्रज्ञानावर काम करु शकते. याबाबत चर्चा झाली.



याआधी देखील अनेक देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींची कोरोनाच्या संकटावर चर्चा सुरु आहे. अमेरिका, ब्राझील, इस्राईल आणि इतर अनेक देशांना भारत औषधे पुरवत आहे.



अमेरिका, ब्राझील आणि इस्राईलला भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करणं सुरु केलं आहे. यासाठी या देशांनी भारताचे आभार देखील मानले आहेत.