पॅरीस : रूससह ३ देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आता फ्रांसला पोहोचले आहेत. चार देशांच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी शनिवारी 3:15 मिनिटांनी फ्रांसची राजधानी पॅरीस येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी या दौऱ्यामध्ये फ्रांसचे नवे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत. 


पंतप्रधानांची ही फ्रांस यात्रा दोन्ही देशांच्या परस्पर संबधांसाठी खूप महत्त्वाची आहे. फ्रांस हा देश संरक्षण, अंतराळ, अणू आणि नवीकरणीय ऊर्जा, शहरी विकास आणि रेल्वे क्षेत्रात भारताचा 9वां सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि मित्र देश आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात फ्रांससोबत दहशतवादी, एनएसजीमध्ये भारताची सदस्यता आणि वातावरण बदल या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.