पॅरिस : गेल्या पाच वर्षांत भारतात सकारात्मक बदल होत आहेत. विकासाच्या मार्गाने देश घोडदौड करत आहे. नव्या भारतात भ्रष्टाचार, घराणेशाही, जनतेच्या पैशांची लूट करणाऱ्यांना थारा नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पॅरिसमध्ये बोलताना स्पष्ट केले. सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी युनेस्को मुख्यालयात भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी भ्रष्टाचार करणाऱ्यांना इशारा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादाविरोधात भारत आणि फ्रान्स एकजुटीने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. येत्या ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार असून, भारताची ही लक्षवेधी कामगिरी असल्याचे कौतुक मोदी यांनी केले आहे. जी- ७ परिषदेसाठी फ्रान्समध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट आहे. भारत आणि फ्रान्स जगातील प्रत्येक टप्प्यावर एकत्र आले आहेत. काहीही झाले तरी दोन्ही मैत्रीपूर्ण देश एकत्र आहेत.


मोदी म्हणाले, सध्या पॅरिस राम भक्तीचा रंग चढला आहे. प्रत्येकजण रामभक्तीत मग्न आहे. इंद्रासमोरही ते कथेसमोर बदलत नाहीत, आज नरेंद्रसाठी त्यांनी कथेची वेळ बदलली. यामागील कारण म्हणजे बापूंच्या रक्तवाहिनीतली भक्ती, देशप्रेम. आज जर मला वेळ मिळाला असेल तर मी नक्कीच त्याची उपासना करायला जाईन. मी येथून नमन करतो आणि अभिवादन करतो.


पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान लोक 'मोदी है तो मुमकिन है' अशा घोषणा दिल्या. यावर मोदी म्हणाले, या कारणास्तव यावेळी देशवासियांनी पूर्वीपेक्षा अधिक जनादेश देत आमच्या सरकारला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली गेली आहे.