नाय पी ताऊ : पंतप्रधान नरेंद्र मोती आणि म्यानमारच्या पंतप्रधान ऑंग सान सू की यांच्यात आज (बुधवार) भेट होईल. दोन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि म्यानमार यांच्यात 'रोहिंग्या' मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीन दौऱ्यावरून मोदी थेट म्यानमार दौऱ्यावर रवाना झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही महिन्यांपासून भारतात रोहिंग्या निर्वासितांची संख्या वाढत आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा चिंतेचा विषय असून, या लोकांना मायदेशी पाठवण्याबाबत भारत विचार करत आहे. भारतात आजघडीला सुमारे ४०,००० रोहिंग्या लोक भारता बेकायदेशीररित्या राहात असल्याचे सांगितले जाते.


दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारचे राष्ट्रपती हतीन क्याव यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. ही चर्चा शानदार होती असे मोदींनी म्हटले. चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. या चर्चेनंतर मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, राष्ट्रपती यू हतीन क्याव यांच्यासोबतची चर्चा शानदार राहिली. चर्चेदरम्यान त्यांनी सालवीन नदीच्या कलम १८४१चा नकाशाची एक नवी प्रत आणि बोधी वृक्षाची एक प्रतिकृती भेट दिली.




ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर गेलेले मोदी तेथूनच म्यानमार दौऱ्यावर पोहोचले आहेत.