नायपिदॉ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार मधील राखीन प्रांतात होणा-या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला. भारत म्यानमारमधील शांतीसाठी हरएक प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांच्या संयुक्त परीषदेत पंतप्रधानांनी रोहिंग्या मुसलमानांचा मुद्दा उपस्थित केला. शेजारी असल्याच्या नात्याने आम्ही म्यानमारमधील आव्हानांना समजू शकतो, भारत शांतता निर्माण होण्यासाठी सर्वप्रकारची मदत करेल, असं मोदींनी स्पष्ट केलं.


दहशतवादा विरोधात भारताची लढाई सुरु आहे. भारत आणि म्यानमार दोन्ही देशांमध्ये सिमा नाही. तर भावना एकमेकांशी जोडल्या गेल्यात, असं मोदी म्हणाले. मॅनमारच्या स्टेट काऊंन्सलर आंग सान सू की यांनी रोहिंग्या मुसलमानांवरच्या हिंसाचाराच्या मुद्यावर दहशतवादी संघटना चुकीचं वृत्त पसरवत असल्याचं म्हटलं आहे. राखीन प्रांतात होणा-या हिंसाचाराच्या मुद्यावर म्यानमार सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे.