नवी दिल्ली : जपानच्या ओसाकामध्ये सुरु असलेल्या जी-20 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्वीपक्षीय चर्चा झाली. यावेळी ईराण, 5 जी, द्वीपक्षीय संबंध आणि सुरक्षा या मुद्यांवर चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी मजबूत होतील आणि लोकतंत्र आणि शांतीसाठी आपण प्रतिबद्ध असू असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. हा केवळ निष्पापांचा बळीच घेत नाही तर आर्थिक आणि सामाजिक शांतीवरही नकारात्मक प्रभाव आणत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. दहशतवादाची मदत करणारी सर्व माध्यमांवर रोख आणण्याची गरज आहे. जपान, अमेरिका आणि भारत म्हणजेच JAI आहे. मेक इन इंडीयाच्या मंत्रासोबत भारत, अमेरिका आणि जपान पुढे जात आहे. यावेळी सबका साथ, सबका विकास हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.



त्रिपक्षीय चर्चा 


जपानमध्ये ओसाका शहरात सुरु असलेल्या जी २० परिषदेपूर्वी भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांच्या प्रमुखांनी भेट घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे अध्यक्ष शिंजो आबे या तीन नेत्यांची त्रिपक्षीय चर्चा झाली. जपान अमेरिका इंडिया ही तीन अद्याक्षरं मिळून जय असा शब्द होतो, 'जय'चा भारतात अर्थ विजय असा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.