नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेदरलँडचा दौरा केला. या दौऱ्यावर नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनी नरेंद्र मोदी यांना चक्क सायकल भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी या सायकलचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या आगळ्या वेगळ्या भेटीमुळे दोन्ही देशाचे पंतप्रधान खुश असल्याचे या फोटोत पाहायला मिळतंय. या सायकल भेटीसाठी पंतप्रधान मोदी यांनी रुट यांचे आभार मानलेत. 


नेदरलँडमधील अनिवासी भारतीयांनी दिलेल्या भरभरुन प्रेमाबद्दल मोदींनी त्यांचेही आभार मानलेत. नेदरलँडमध्ये सायकल हे महत्त्वाचं वाहन समजलं जातं. 


इथले बहुतांशी नागरिक सायकलचाच वापर करतात. खुद्द पंतप्रधान मार्क रुट हेसुद्धा कधी कधी सायकलनंच प्रवास करतात. त्यामुळे मोदींना मिळालेल्या या खास सायकल गिफ्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय.