लंडन : बहुतेक लोकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा कठोर स्वभावाची व्यक्ती म्हणूनच असते. परंतु, बर्‍याच वेळा पोलिसांनी माणुसकीचे असे बरेच उदाहरण समोर ठेवले आहे. सहसा जेव्हा पोलीस कोणाच्या दारवाजा ठोठावतात तेव्हा लोकं घाबरतात. आपण कोणता तरी गुन्हा केला की काय़? असा विचार करु लागतात. त्यांना असे वाटते की, आता ते काही ना काही कायदेशीर अडचणीत सापडतील. पण समजा पोलिस तुमच्या दारात अन्न पोहचवण्यासाठी पोहोचले तर? अमेरिकेतील एका महिलेसोबत अशी घटना घडली आहे. तिच्या घरी चक्कं अन्न पोहचवण्यासाठी पोलिस पोहोचले तेव्हा या महिलेला आश्चर्य वाटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण त्या महिलेनं ऑनलाइन ऑर्डर केलेल्या फूडची डीलिव्हरी पोहचवण्यासाठी डीलिव्हरी बॉयऐवजी पोलीस अधिकारी घेऊन घरी पोहचले.


वास्तवीक या महिलेने एका रेस्टॉरंटमधून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली होती. जेव्हा डीलिव्हरी बॉय जेव्हा त्याचे जेवण या महिलेच्या घरी पोहचवत होता तेव्हा, पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यासाठी अटक केली. 


मात्र, यानंतर पोलिसांना समजले की, त्याला एका महिलेची जेवणाची ऑर्डर पोहचवायची आहे. ती महिला या जेवणाची वाट पाहात असावी, यानंतर पोलिस अधिकाऱ्याने या डीलिव्हरी करण्याचा पत्ता घेतला आणि आपली ड्यूटी सोडून त्या महिलेकडे अन्न पोचवण्यासाठी पोहचले.


जोन्सबोरो पोलिसांनी सामायिक केलेल्या फुटेजमध्ये असे दिसून येते की, जेव्हा या पोलिस आधिकाऱ्याने दरवाजा ठोठावला तेव्हा समोर पोलिसांना पाहून ती गोंधळून गेली. त्या व्हिडीओमध्ये, पोलिस अधिकारी त्या महिलेला असे सांगताना दिसत आहे की, "आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. तू शेरी आहेस का? तुमचे पार्सल डीलिव्हरी करणाऱ्या मुलाला अटक केली गेली आहे, म्हणून मी हे फूड आणले आहे."