शरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.
Pope Francis on sexual pleasure : जागतिक स्तरावर अनेक धर्मगुरू विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात. अनेकदा ही मतं त्या त्या धर्माला अनुसरून असतात. तर, अनेकदा ही मतं इतकी चौकटीबाहेरची असतात की पाहणारेही हैराण होतात. असंच एक मत मांडलं आहे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी. मानवी शरीर, निसर्गाचे नियम आणि संयम या गोष्टींना अनुसरून त्यांनी एक नजरा वळवणारं वक्तव्य केलं आहे.
'संभोगसुख म्हणजे देवाची देणगी' असं पोप फ्रान्सिस नुकतंच म्हणाले आहेत. संयमानं आणि योग्य रितीनं केलेला संभोग जणू देवाचीच देणही आहे असं ते म्हणाले. त्यांनी pornography चा मात्र कडाडून विरोध केला. कोणत्याही नात्याशिवाय संतुष्ठीची भावना या पॉर्नोग्राफीमुळं निर्माण होऊन पुढं ती एखाद्या व्यक्तीला व्यसनाधीन करते हा मुद्दा त्यांनी प्रकाशझोतात आणला. the demon of lust संदर्भातील मतप्रदर्शन करतेवेळी बुधवारी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
हेसुद्धा पाहा : रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
आपण प्रेमाच्या भावनेला जपलं पाहिले आणि वासनेच्या लढ्याविरोधात विजयी झालं पाहिजे. मानवी जीवनासाठी हा आजीवन सुरु असणाराच प्रवास असेल, असंही पोप फ्रान्सिस यावेळी म्हणाले. पॉर्नोग्राफी आणि तत्सम प्रकारामुळं समाजात अनेक वाईट प्रवृत्ती वास करतील या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला.
'वासना मानवाला उध्वस्त करते आणि संयमाअभावी त्याला नष्ट करते. बऱ्याचदा ती इतकी बळावते की इतरांचं म्हणणंही दुर्लक्षित ठेवलं जातं. इथं फक्त आत्मसुखासाठीच सर्वकाही सुरु असतं. मुळात वासना प्रेमभावनेचा नायनाट करते', असं म्हणत असताना वासनेची भावना अनेका दोन व्यक्तींना एकमेकांना वस्तूप्रमाणं वागणूक देण्यास भाग पाडत त्यांच्यावर अधिपत्य गाजवण्यासाठी प्रवृत्त करणारं एक कारण ठरते हा विचारही त्यांनी मांडला. पोप फ्रान्सिस यांनी हा विचार मांडल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.