मुंबई : एका पॉर्न स्टारने आपल्या आयुष्यातील एका किळसवाण्या प्रकाराबद्दल खुलासा केला आहे. तिच्यासोबत घडलेली ही घटना फारच धक्कादायक आहे. पॉर्न स्टार लिसा ऍनने स्वत: या प्रकणाबद्दल स्पष्टीकरणं केलं. या घटनेनंतर ती जेव्हाही बाहेर जाते तेव्हा सशस्त्र बॉडिगार्ड घेऊन जाते. तिने सशस्त्र बॉडिगार्ड नेमले कारण तिचे असे अनेक चाहते आहेत जे तिच्या मागे वेडे झाले आहेत. त्यामुळे या वेड्या चाहत्यांनी तिचे आणखी काही नुकसान करू नये असे तिला वाटते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 49 वर्षीय लिसाने 1997 मध्ये पॉर्नमधून संन्यास घेतला होता. पण त्यानंतर 2008 मध्ये ती पुन्हा या इंडस्ट्रीत परतला आणि तिची कारकीर्दही खूप यशस्वी झाली.


लिसाने पॉडकास्टही सुरू केले. त्याचे नाव आहे 'ड्यूड्स डू बेटर'. येथे ती अडल्ट मॉडेल्सशी त्यांच्या अनुभवांबद्दल बोलते. इथे एका एपिसोडमध्ये बोलताना लिसाने तिच्या सोबत घडलेल्या भयानक किस्स्याबद्दल सांगितले.


लिसाने सांगितले की, तिच्या मागे एक चाहता इतका वेडा होता की, त्याने दाताने तिच्या पायाला मोठा चावा घेतला. हा चावा इतका मोठा होता की, त्याने चक्क तिच्या पायाची चामडी देखील काढली आणि त्या तुकड्याला स्वत:कडे ठेवले.


हेजल मूरला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लिसाने सांगितले की, या घटनेनंतर लिसाने स्वत:च्या रक्षणासाठी एक सशस्त्र बॉडिगार्ड नेमला. ती जेव्हा कुठे बाहेर जाते तेव्हा ती या बॉडीगार्डसोबत जाते. ती म्हणाले की, आम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करत आहोत, त्या इंडस्ट्रीत अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते.


पुढे ती म्हणाली, "या इंडस्ट्रीमध्ये असलेल्या पुरुषांची परिस्थिती महिला पोर्न स्टार्सपेक्षा खूप वेगळी असते. मी माझ्या एका मित्राला याबद्दल अनेकदा चिडवते. मी त्याला सांगते की, जेव्हा तुम्ही लोकांसमोर जाता तेव्हा लोक तुमची प्रशंसा करतात. तर तीच माणसं महिला पोर्न स्टार्सकडे वेगळ्या नजरेने पाहतात.


लिसाने यासाठी लोकांना सुचवले की, त्यांनी आपल्या मुलांना इतके जागरूक केले पाहिजे की, ते इतर स्टार्सइतकेच पॉर्न स्टार्सचा आदर देतील. लिसाचे चरित्र प्रकाशित झाले आहे. त्यात तिने सांगितले की, तिच्या कामामुळे लोक तिच्याकडे संशयाने बघतात. लोक तुमच्याशी सामान्य माणसासारखे वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नजरा आणि मत बदलण्याची गरज आहे.