आता मंगळ आणि चंद्रावर भाज्यांची शेती
नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा
मुंबई : नासाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम पद्धतीने मंगळ ग्रह आणि चंद्रावर अनोख यश मिळवलं आहे. या ठिकाणी पुरक हवामान आणि माती तयार करून भाज्यांच्या लागवडीसाठी योग्य असं वातावरण निर्मिती करण्यात नासाला यश मिळालं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर भविष्यात मंगळ आणि चंद्रावर मानवी वस्ती झाली तर तेथे त्यांच्याकरता खाद्य पदार्थाची लागवड केली जाऊ शकते.
नेदरलँडचे वगेनिंगेन युनिवर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे देखील सांगितलं आहे की, मंगळ आणि चंद्रावर उगवलेल्या भाज्यांमधून बी या देखील मिळू शकतात. ज्यामुळे नवीन खाद्य पदार्थाची शेती करण्यास मदत होईल. यामध्ये हलीम, टोमॅटो, मूळा, राई, क्विनोआ (बथुआ) पालक आणि मटरसोबत दहा वेगवेगळ्या भाज्या लावू शकतो.
शास्त्रज्ञ वीगर वेमलिंकने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही कृत्रिम पद्धतीने शेती केली तेव्हा मंगळ ग्रहावरील मातीत पहिल्यांदा टोमॅटोची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर पहिल्यांदा लाल टोमॅटो पाहिले तेव्हा उत्साह द्विगुणीत झाला. यानुसार आम्ही मंगळावर शेती करण्याकडे पहिलं यशस्वी पाऊल उचललं आहे. याचा अर्थ शेतीच्या परिसंस्थेत (इको सिस्टीम) टिकाऊ गोष्टींमार्फत एक पाऊल पुढे टाकतं आहोत. असं शास्त्रांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ मंगळ ग्रह आणि चंद्रावर पृथ्वीवरील वरच्या थरावरील माती घेऊन गेले होते. त्यांचं मिश्रण करून कृत्रिम पद्धतीने वातावरण निर्माण केलं होतं. या वातावरणात आता शेती करू शकतो असा दावा नासाने केला आहे. एका इंग्रजी वेबसाइटने देखील ही माहिती दिली आहे.
दहा भाज्यांपैकी नऊ भाज्या जगल्या असून त्यांची चांगली वाढ झाली आहे. तसेच खाद्यतेलाची देखील निर्मिती यातून होऊ शकते. फक्त पालक याला अपवाद ठरला आहे. 'ओपन अॅग्रीकल्चर' (Open Agriculture) या जर्नलमध्ये याची मांडणी केली आहे.