Prediction On The World End: पृथ्वीचा विनाश हा अटळ आहे. एका ना एक दिवस पृथ्वीचा अंत होणार हे निश्चित. पृथ्वीचा शेवट कधी आणि कास होणार याबाबत अनेक दावे केले जातात. तर्क वितर्क मांडले जाता.  जगाच्या विनाशाबाबत अनेक भयानक भविष्यवाणी करण्यात आल्या आहेत. प्रथमच पृथ्वीच्या विनाश कशामुळे होऊ शकतो याची पाच कारणे समोर आली आहेत. 


हे देखील वाचा... बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सूर्यमालेत फक्त पृथ्वीवरच जील सृष्टी अस्तित्वात आहे. पृथ्वीचा नाश आणि जगाचा अंत याबद्दल भाकीत वर्तवली जातात.  मानवनिर्मित कारणांमुळे पृथ्वीवरुन सजीवाचे अस्तित्व संपून जाईल असा दावा अनेक शास्त्रज्ञ करतात. ग्लोबल वार्मिंग तसेच क्लायमेंट चेंज जबाबदार ठरु शकते असे बोलले जाते. अनेक नैसर्गिंक कारणांमुळे पृथ्वीच्या विनाश होऊ शकतो. विनाशाची ही पाच कारणे समोर आली आहेत. 


पहिले कारण लघुग्रह पृथ्वीला धडकणार


लघुग्रह धडकून पृथ्वीचा विनाश होऊ शकतो. यामागे वैज्ञानिक घटनांचे पुरावा आहेत. सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला आणि डायनासोर नामशेष झाले. पुन्हा एकदा असाच विनाश होऊ शकतो. पृथ्वीला लघुग्रह धडकून भूकंप, वादळ, पूर आणि सुनामी येऊ शकते. यामुळेच अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि जगभरातील अवकाश संस्था पृथ्वीभोवती फिरणाऱ्या लघुग्रहांचा बारकाईने निरीक्षण करत आहे. तसेच पथ्वीला धजकण्याची शक्यता असलेल्या लघुग्रहांची दिशा बदलण्याचाही प्रयत्न केला जात आहे. 


दुसरे कारण ज्वालामुखीचा उद्रेक


ज्वालामुखीचा उद्रेक देखील पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरु शकतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जळणारा लावा, ज्वलनशील राख आणि वायू पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडतात. जवळपास 74,000 वर्षांपूर्वी इंडोनेशियातील टोबा कॅल्डेरा  ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामुळे पृथ्वीवर भयानक हिवाळा आणि उन्हाळा निर्माण झाला होता. जर पुन्हा एकदा असा सुपर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर त्यातून निघणाऱ्या राखमुळे सूर्यप्रकाश रोखला जाईल. तापमान झपाट्याने खाली येईल. शेती आणि अन्न पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल.


तिसरे कारण हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंज


हवामानातील बदलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीलाही धोका निर्माण होत असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.  इंधन जाळणे आणि जंगले तोडणे यामुळे हवामान बदल होत आहे.  हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यामुळे बर्फ वितळत आहे. समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. भविष्यात वादळ, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांसारख्या घटनांमुळे पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येईल.


चौथे कारण आण्विक युद्ध


अणुबॉम्ब आणि अणुयुद्ध पृथ्वीच्या विनाशासाठी कारणीभूत ठरु शकतात. अण्वस्त्रांच्या वापरामुळे होणाऱ्या स्फोटांमुळे पृथ्वीला धोका निर्माण होत आहे.  आण्विक स्फोटांमुळे शहरे आणि जंगले जळतील. थेट कृषी क्षेत्रावर याचा परिणाम होईल. 


पाचवे कारण AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता


21 व्या शतकातील तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे देखील जगाच्या अंताचे एक कारण बनू शकते. हे तंत्रज्ञान मानवी जीवनात क्रांती घडवत असले तरी सुपर इंटेलिजेंट मशीन तयार झाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. माणसाइतका विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता त्याxच्यात नसेल. जर एआय नियंत्रणाबाहेर गेले किंवा विकसित झाले तर ते मानवी अस्तित्वाला धोका निर्माण करू होऊ शकतो.