नवी दिल्ली : तैवान आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे आभार मानले आहेत. तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी ट्विट करुन भारतीयांचे आभार मानले असून त्यांनी भारतातील जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वस्तुतः तैवानच्या राष्ट्रीय दिनी भारतीयांनी तैवानचे मनापासून अभिनंदन केले होते. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांना भारतीयांची ही मैत्रीपूर्ण कल्पना आवडली आहे. त्याला उत्तर म्हणून राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी ट्विट केले होते. त्यांनी भारतीयांचे आभार मानले आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय वारसाचे कौतुक केले.



त्साई इंग-वेन यांनी ताजमहाल भेटीचे फोटो ट्विट करत म्हटलं की, 'नमस्कार माझ्या भारतीय मित्रांनो, मला फॉलो केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या शुभेच्छा संदेश अविस्मरणीय देशात घालवलेल्या संस्मरणीय क्षणांची आठवण करुन देते. आपल्या वास्तु, जीवंत संस्कृती आणि दयाळू लोकं वास्तवात अविस्मरणीय आहे. मला ते क्षण खूप आठवतात.'


परराष्ट्र मंत्रालयानेही आभार मानले


यापूर्वी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीयांचे आभार मानले. मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, तैवान या अद्भुत समर्थनाबद्दल आनंदी आहे. आम्ही जेव्हा म्हणतो की, आम्हाला भारत आवडतो. कारण आम्ही ते मानतो.'



तैवानने यावेळी चीनवर टीका देखील केली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, भारताची जमीन ही सर्वात मोठी लोकशाही आहे. जेथे जीवंत मीडिया आणि स्वतंत्र लोकं आहेत. पण असं वाटतं की, कम्यूनिस्ट चीन सेंसरशिप लादून उपमहाद्वीपमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. तैवानच्या भारतीय मित्रांचा एकच उत्तर असेल 'गेट लॉस्ट.'


तैवानला अमेरिकेचा उघड पाठिंबा


तैवान आणि चीनमधील तणाव निरंतर वाढत आहे. जगातील सर्व देशांनी तैवानशी असलेले संबंध तोडले पाहिजेत अशी चीनची इच्छा आहे, कारण तो तैवानवरील आपला अधिकार ठामपणे सांगत आहे. पण तैवानशी भारताचे चांगले संबंध आहेत, ही गोष्ट चीनला सहन होत नाही. याशिवाय अमेरिका देखील तैवानचं समर्थन करते. चीनशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिका तैवानला शस्त्रे देत आहे.