नवी दिल्ली : पीओकेची राजधानी मुजफ्फराबादमध्ये पाकिस्तानविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांवर अश्रूधुराचा वापर देखील करण्यात आला. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे तर शंभरहून अधिकजण जखमी झाले आहेत. इम्रान खान सरकारविरोधात यावेळी पीओकेमध्ये घोषणाबाजी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर एकच धावपळ झाल्याचं पाहायला मिळतं आहे. लोकं आपला जीव वाचवण्यासाठी जीव घेऊन पळत होते. एका आंदोलनकर्त्याने म्हटलं की, काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन सुरु होतं. सरकारने काहीही केलं तरी आम्ही आपला आवाज कमी होऊ देणार आहे.' मागील वर्षी 22 ऑक्टोबरला देखील मुजफ्फराबाद, रावलकोट, गिलगित, रावळपिंडी आणि इतर ठिकाणी विरोध पाहायला मिळाला होता.


पाकिस्तानच्या लष्कराने 22 ऑक्टोबर 1947 ला जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. यानंतर पीओकेवर त्यांनी ताबा मिळवला होता. त्यामुळे दरवर्षी पीओेके मधील लोकं हा दिवस काळी दिवस म्हणून साजरा करतात.