पाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी

अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे.
पॅरिस : अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्यानं अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. गेल्या वर्षी एफ. ए.टी.एफ.ने पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये टाकले आहे. मात्र त्यानंतरही आयसिस, अल कायदा, जामात उद दवा, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या अतिरेकी संघटनांना मिळणारा पैसा रोखण्यासाठी पाकिस्तानने काहीही केले नसल्याचं संस्थेनं म्हटले आहे. याबाबतची कार्यवाही मे २०१९पर्यंत पूर्ण करावी, असंही एफ.ए.टी.एफ.ने पाकिस्तानला बजावले आहे.
भारताने युद्ध लादले तर प्रत्युत्तर देऊ - पाकिस्तान
पुलवामा हल्ल्यासह भारतात होणाऱ्या हल्ल्यांमागे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचा हात असल्याचं भारत सातत्यानं सांगत आला आहे. एफ.ए.टी.एफ.ने दिलेल्या या इशाऱ्यामुळे भारताच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. तसेच दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध नोंदवला आहे. एवढेच नाही तर जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दावा फोल ठरला आहे. सुरक्षा परिषदेत चीनही कायमस्वरूपी सदस्य आहे. अझर मसूदला दहशतवादी घोषीत कऱण्याविरोधात चीन सातत्याने नकाराधिकार वापरत होता. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेच्या या ठरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पहिला मोठा राजनैतिक विजय
तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याबाबात पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानवर चौहोबाजुने दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने हा हल्ला भारतीयानेच केल्याचा दावा केलाय. पुलवामा हल्ल्यामध्ये काश्मीरींचा सहभाग असल्याचा पाकिस्तानच्या लष्कराने दावा केलाय. पाकिस्तानकडून युद्धाबाबत हालचाल सुरु नाही. भारत युद्धाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिकडून हल्ला झाला तर पाकिस्तान आपल्या आत्मसंरक्षणासाठी तयार आहे. पूर्वीच्या युद्धातील पाकिस्तान नाही, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे.