Queen Elizabeth IIs Funeral Live: राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार; सारं जग पाहणार हे ऐतिहासिक क्षण
Queen Elizabeth II : राणीवर होणारे अंत्यसंस्कार Live कुठे पाहाल?
Queen Elizabeth IIs Funeral : (Longest Serving monarch) सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सिंहासनाची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत प्रभावी कामगिरी आणि पदाचा मान राखत सेवा करणाऱ्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज (19 सप्टेंबर 2022) रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संपूर्ण राजकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येईल. काही दिवसांपासून राणीचं पार्थिव वेस्टमिंस्टर पॅलेस येथे आहे. सर्वाधिक काळ राणीपद भूषवणाऱ्या एलिझाबेथ यांना निरोप देण्यासाठी आतापर्यंत जवळपास 8 लाख ब्रिटन आणि परदेशी नागरिकांनी हजेरी लावली.
दरम्यान, राणीला अखेरचा निरोप देण्यासाठी जवळपास 4 हजार सशस्त्र जवान सहभागी होणार आहेत. इतकंच नव्हे, तर संपूर्ण जगभरात विविध माध्यमांतून हे अंत्यसंस्कार Live पाहता येणार आहेत. अनेक माध्यमं आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार संपूर्ण जग होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारास सुरुवात होणार आहे.
भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली किंग चार्ल्स यांची भेट
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनीही महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्या पार्थिवापुढे उभं राहत त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी तिथं असणाऱ्या शोक पुस्तिकेमध्ये मनोगतही व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रपतींनी किंग चार्ल्स (King Charles III) यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.
भारताच्या राष्ट्रपतींसमवेत जगभरातील विविध राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि उच्चस्तरिय अधिकारी, राजे, शाही कुटुंबातील सदस्य राणीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होणार आहेत.