Queen Elizabeth IIs Funeral : `रॉयल वॉल्ट` एक असं तळघर, जिथं पुरलं जाणार राणी एलिझाबेथ यांचं पार्थिव
Queen Elizabeth IIs Funeral : इथंच पुरलं जातं राजघराण्यातील व्यक्तींचं पार्थिव... जाणून घ्या त्या रहस्यमयी जागेविषयी
Queen Elizabeth IIs Funeral : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनी 8 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप गेतला. राणीच्या निधनाची बातमी संपूर्ण जगभरात पसरली आणि प्रत्येत स्तरातून राजपद भूषवणाऱ्या या राणीला श्रद्धांजली देण्यात आली. सध्या राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी ब्रिटनमध्ये तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरातून या ठिकाणी प्रतिष्ठित आणि बड्या व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वत्र राणीच्या अंत्यसंस्कारांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. (Queen Elizabeth IIs Funeral Today royal vault of windsor castle)
Queen Elizabeth II यांचं पार्थिव त्यांचे पती, ड्यूक ऑफ एडिनबर्ग(Duke of Edinburgh) यांच्यासोबत विंडसर कॅसल (Windsor Castle) मधील रॉयल वॉल्ट इथं पुरण्यात येणार आहे. मागच्याच वर्षी एप्रिल महिन्यात प्रिन्स फिलिप यांचं निधन झालं होतं.
काय आहे रॉयल वॉल्ट(Royal Vault) ?
विंडसर कॅसलच्या (Windsor Castle) मैदानानजीक असणाऱ्या सेंट जॉर्ज चॅपल येथे जमिनीच्या खाली हे वॉल्ट आहे. जमिनीपासून ते साधारण 16 फूट खाली आहे. म्हणायला तर हे एक सर्वसाधारण शवगृह आहे. पण, ते अतिशय भव्य आहे. इथं ब्रिटीश राजघराण्यातील अनेक थडगी ठेवण्यात आली आहेत. सेंट जॉर्ज हा एक मध्ययुगीन महाल आहे. गेल्या एक हजार वर्षांहून जास्त काळापासून त्याचा शाही कुटुंबाशी संबंध आहे.
'This Bloody thing...' म्हणणाऱ्या King Charles III यांचं संतप्त रुप पहिल्यांदाच जगासमोर; Video Viral
70 फूट लांब आणि 28 फूट रुंद अशा या तळघराचं प्रवेशद्वार लोखंडाच्या दरवाजानं बंद करण्यात येतं. यामध्ये 44 थडगी ठेवण्याची व्यवस्था आहे. 32 शाही सदस्याचं पार्थिव दगडानं बांधण्यात आलेल्या कपाटवजा भागात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. तर उर्वरित पार्थिवं मध्यभागी आहेत.
अंत्यसंस्कारादरम्यान या तळघराचा एक स्लॅब बाजूला करण्यात येतो. ज्यानंतर एका इलेक्ट्रीक लिफ्टच्या सहाय्यानं थडगं तळघरात जातं. ज्यानंतर तिथं ते योग्य ठिकाणी ठेवण्यात येतं. (King George III) किंग जॉर्ज III यांनी 1804 मध्ये हे रॉयल वॉल्ट तयार करण्याचे आदेश दिले होते. 1810 मध्ये ते बांधून पूर्ण झालं. 1820 मध्ये या तळघरात पार्थिव पुरलं जाणारे ते पहिले राजे ठरले.
Queen Elizabeth IIs Funeral Live: राणी एलिझाबेथ II यांच्यावर आज अंत्यसंस्कार; सारं जग पाहणार हे ऐतिहासिक क्षण
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचं पार्थिवही इथंच आहे. त्याच ठिकाणी आता राणीचं पार्थिवही ठेवण्यात येईल. मृत्यूपश्चातही ही शाही जोडी एकमेकांची साथ देत राहील... हा सुरेख संदेश इथं मिळत आहे.