Dubai rain News : जगभरात अनेक ठिकाणी शीतलहर आली आहे मात्र दुबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अबुधाबीमध्ये पावसाने धुमशान पाहायला मिळालं आहे. दुबईच्या पावसाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबई प्रशासनाने वाहन चालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना देण्यात आलं आहे. (raining in uae social media deluged with beautiful images videos latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांनी पाऊस पडल्यानंतर दुबईतील रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने वाहनचालकांना वाहनं सावकाश चालवण्याचा सल्ला दिला आहे. दुबई रोड ट्रान्सपोर्ट ऍथॉरिटी म्हणजेच RTA ने याबाबत अधिकृत ट्विट देखील केलं आहे. RTA ने आपल्या ट्विटर हँडलवर #YourSafetyOurPriority हॅशटॅगसह याबाबतचा सल्ला पोस्ट केला आहे.



 



 



 



अबुधाबी, शारजाह आदि प्रमुख शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत आहे. या पावसामुळे जनजीवन झाले आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी पावसाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. दुबईतील पावसाने तिथे आल्हाददायक वाटेवर तयार झालं आहे. दुबईच्या अल जाफिलिया, शेख मोहम्मद बिन झायेद रोड आणि माजानसह शहराच्या भागात पाऊस अनुभवायला मिळाला. यानंतर नागरिकांनी आपल्या भावना ट्विटरवर शेअर करतायत.