नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या एका शहरात चक्क दुर्मिळ दोन डोके असलेला साप आढळला आहे. हा दोन तोंडी दक्षिणी तपकिरी अंडी खाणारा साप आहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने या दुर्मिळ सापाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून त्याच्या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या वेदवे परिसरात एक अत्यंत दुर्मिळ दोन डोके असलेला साप पकडला गेलाय. संबंधिक व्यक्तीने प्राण्यांसाठी काम करणाऱ्या निक इव्हान्स यांच्याकडे हा साप सुपूर्द केला आहे. यानंतर  इव्हान्स यांनी सापाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत त्याबाबत माहिती दिली. 


सापाचे वैशिष्ट्य 
दोन तोंडी दक्षिणी तपकिरी अंडी खाणारा साप आहे. या सापाला दात नसतात. हा साप रात्री फिरत असून तो साप विषारी नसतो. सहसा त्याची संपूर्ण लांबी 30 इंच असते. पण या दोन तोंडी सापाची लांबी फक्त 30 सेंटीमीटर होती. म्हणजेच हे सापाचे पिल्लू आहे.  


(फोटो: निक इव्हान्स/फेसबुक)

दात नसूनही अंडी फोडतो
साऊथन ब्राउन एग ईटर या नावावरून स्पष्ट होते की, हा साप अंडी खातो. त्याला दात नसतात, परंतु असे असूनही, तो एकावेळी अनेक अंडी फोडतो आणि आतून संपूर्ण पदार्थ खातो. कधीकधी संपूर्ण अंडी लगेचच गिळली जाते. त्याच्या मानेमध्ये ती अंडी फोडण्याची क्षमता असते. नंतर तो अंड्याचे कवच बाहेर फेकतो.


जगण्याची शक्यता कमी
सहसा दोन तोंडी साप क्वचितच दिसतात. या स्थितीला बायसेफली (Bicephaly)म्हणतात. अशी परिस्थिती त्यावेळी उद्भवते जेव्हा जुळे जन्मापूर्वी वेगळे होऊ शकत नाहीत. दहा हजार सापांच्या जन्मावेळी कोणताही एक साप असा दिसतो. पण त्यांच्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे. फार कमी दोन डोके असलेले साप जास्त काळ जगू शकतात.


(फोटो: निक इव्हान्स/फेसबुक)

डॉक्टरांच्या देखरेखीखाली
निक इव्हान्सने हा दोन तोंडी साप डॉक्टरांकडे सुपूर्द केला आहे.  त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. काही दिवस त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल. कारण शास्त्रज्ञांना हे जाणून घ्यायचे आहे की हा साप दीर्घकाळ जगू शकतो का? त्यासाठी त्याला जंगलात, नैसर्गिक अधिवासात सोडणे आवश्यक आहे.