नवी दिल्ली : चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जिओ न्यूज' नुसार, अमेरिकेने 2002 मध्ये पाकिस्तानला नऊ हेलिकॉप्टर दिले होते. 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने यापैकी चार हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले होते. माहिती नुसार, उर्वरित 5 हेलीकॉप्टर सोमवारी इस्लामाबाद मधील वाहतूक विमानांवर लोड केले गेले आहेत आणि आता मंगळवारी अमेरिकेकडे ते परत येण्याची अपेक्षा आहे.


वृत्तानुसार, हे हेलिकॉप्टर्स बलुचिस्तानच्या ऑपरेशन आणि अँटी-ड्रग ऑपरेशनमध्ये वापरली जातात. अमेरिका निर्मित हॅलिकॉप्टरने दहशतवादविरोधी कार्यक्रमात पाकिस्तानला मदत केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर परत केल्याने पाकिस्तानातील अनेक कारवायांवर याचा परिणाम होणार आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर नियंत्रण ठेवण्यावरही परिणाम होईल. सध्या पाकिस्तानच्य़ा गृह मंत्रालयाकडे एकही हेलिकॉप्टर नाही.