Frank Hugerbeats Prediction : तूर्कित आलेल्या भीषण भूकंपाने (Turkey Eearthquake) जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत तुर्कीत 33 हजार हजार नागरिकांचा जीव गमवावा लागलाय, तर मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तुर्की भूकंपाबरोबरच वैज्ञानिक फ्रँक हूगरबीट्स यांचाही उल्लेख केला जात आहे. डच वैज्ञानिक फ्रँक हूगरबीट्स यांनी तुर्कीत आणि आसपासच्या भागात विनाशकारी भूकंपाची भविष्यवाणी केली होती. (Turkey-Syria earthquake death toll passes 33,000)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रँक हूगरबीट्स काय म्हणाले भारताबाबत
फ्रँक हूगरबीट्स यांचा आता आणखी एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी भारताबाबत मोठा दावा केला आहे (Frank Hugerbeats Prediction). भारतीय उपखंडात भूकंप येणार असल्याचं भाकित हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे. हिंद महासागर क्षेत्रावर म्हणजेच भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या आसपासच्या अनेक भागात भूकंपाचं सावट असल्याचं त्यांनी म्हटलंय. (Earthquakes are predicted to occur in the Indian subcontinent)


कोण आहेत फ्रँक हूगरबीट्स?
Frank Huggerbeats हे सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) साठी काम करतात.  ग्रहांच्या हालचालींवर आधारित भूकंपाचं भाकीत ही संस्था वर्तवते. SSGEOS या संशोधन संस्थेतर्फे भूकंपाच्या अंदाज घेण्यासाठी ग्रहांच्या (planet) हालचालींचा खगोलीय अभ्यास केला जातो. फ्रँक हूगरबीट्स यांनी तूर्कीतल्या भूकंपाची भविष्यवाणी वर्तवली होती. भूकंपाची भविष्यवाणी करताना हूगरबीट्स यांनी त्याचा सखोल अभ्यास केला होता. या अभ्यासात त्यांना भूकंपाशीसंबंधीत काही हालचाली जाणवल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आधीच इशारा दिला होता. 


फ्रँक यांचे दावे चुकीचे?
सोशल मीडियावर (Social Media) फ्रँक यांच्या दाव्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहेत. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (Geological Survey) करणाऱ्या तज्ञ्जांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने (Scientist) भूकंपाचा अंदाज वर्तवला नाही. वैज्ञानिकांकडून भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीबद्दल बरेच विवाद आहेत.


आता हूगरबीट्स यांनी भारतीय उपखंडाबद्दल केलेल्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावर फ्रँक यांनी उत्तर दिलं आहे. वैज्ञानिक भूकंप कधी येऊ शकतो याचा केवळ अंदाज वर्तवू शकतात. पण ठरावित तारीख आणि अचूक स्थानाची माहिती मात्र देऊ शकत नाही असं हूगरबीट्स यांनी म्हटलं आहे. 


फ्रँक हूगरबीट्स हेकाम करत असलेल्या संस्थेने भूतकाळात आलेल्या भीषण भूकंपांचा अभ्यास केला आहे.  ही संस्था ग्रहांच्या स्थितीपाहून भूकंपाचा अंदाज वर्तवते. त्यानुसार फ्रँक हूगरबीट्स यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह हिंद महासागर क्षेत्रात शक्तीशाली भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. 2001 मध्ये भारतात आलेल्या भूकंपासारखा भविष्यात येणारा भूकंप किती विनाशकारी असेल याचा आताच अंदाज वर्तवणं शक्य नसल्याचंही फ्रँड हूगरबीट्स यांनी म्हटलंय. 


फ्रँक हूगरबीट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तुर्कीतल्या वैज्ञानिकांशी संपर्क साधला होता, पण काही मोजक्याच वैज्ञानिकांनी याबाबत रुची दाखवली होती. सीरियातले वैज्ञानिक संपर्कात होते, असं फ्रँक हूगरबीट्स यांनी म्हटलंय. तसंच भारत सरकारने आपल्याशी संपर्क साधला तर त्यांना आपण मदत करु शकतो असं फ्रँक यांनी म्हटलं आहे.