मुंबई : ट्विटर विकत घेतल्यापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क  (Elon Musk)  चर्चेत आहेत. ट्विटरबाबत एलन मस्क यांचे अनेक निर्णय चर्चेत आहेत. पण या श्रीमंत व्यक्तीवर ऑफीसमध्येच झोपवण्याची वेळ आली आहे. एलन मस्क यांनी सैन फ्रांसिस्को येथील ट्विटर हेडक्वार्टरमध्येच  (Elon Musk) झोपत आहे. याआधी ट्विटरचे कर्मचारी देखील नव्या बॉसच्या दहशतीमुळे ऑफिसमध्येच झोपत असल्याचं समोर आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिझनेस इनसाईडरने दिलेल्या बातमीनुसार,  Twitter खरेदी केल्यानंतर एलन मस्क (Elon Musk) नव्या निर्णयांमुळे चर्चेत आहेत. काही निर्णयांवर टीका देखील होत आहे. एलन मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. जोपर्यंत ट्विटरमध्ये सर्वकाही सुरळीत होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. पण नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट करुन टाकलं.


ट्विटर कंपनी टेकओव्हर केल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक आदेश काढले. 50 टक्के कर्मचारी काढून टाकल्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 80 तास काम करण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ दिवसाला 16 तास काम करावे लागणार आहे. एलन मस्क यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


Forbes ची रियल टाईम बिलेनियर्स यादीत 196.5 अरब डॉलरची संपत्ती असलेले एलन मस्क (Elon Musk Net Worth) यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेण्याचा निर्णय घेतला. 44 अरब डॉलरमध्ये त्यांनी ट्विटरला टेकओव्हर केलं. कंपनी विकत घेताच त्यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह 3 महत्त्वाच्या लोकांना कंपनीतून काढून टाकले होते.