Roller Coaster Stuck Upside Down: काहीतरी रोमाचंक करण्याची किंवा अंगावर काटा उभा राहिल असं काहीतरी धाडस करणारी लोक जगात कमी नाहीत. अनेकदा या धाडसाच्या नादात लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा अशा धाडसवेड्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र अशाप्रकारे वेडं साहस दाखवणं किंवा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा कधीतरी या लोकांना अडचणीत आणू शकते. रोलर कोस्टर राइडच्या माध्यमातून उंचीचं धाडस आजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना हे धाडस फारच महाग पडल्याचं नुकतेच पहायला मिळालं. झालं असं की रोलर कोस्टर राईड सुरु असताना अचानक रोलर कोस्टर बंद पडला आणि लोक हवेतच उटली लटकून राहिली. ही दुष्य पाहून नक्कीच तुम्हालाही घाम फुटेल.


कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही सुद्धा कधी ना कधी रोलर कोस्टरमध्ये बसला असाल. मात्र अशा विचार करा की या राईडदरम्यान अचानक रोलर कोस्टर बंद पडला तर तुमचीही भितीने गाळण गळेल की नाही? अमेरिकेत खरोखर असा प्रकार घडला असून यासंदर्भातील व्हिडीओ साशा व्हाइट नावाच्या अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आला आहे. रोलर कोस्टर राइड सुरु असताना अचानक एका सर्कलवर रोलर कोस्टर बंद पडतो. हा रोलर कोस्टर बंद पडला तेव्हा तो एका गोलाकार मार्गावर होता जिथे रोलर कोस्टरमधील लोक हे जमीनीकडे डोकं करुन उलट्या अवस्थेत होते. याच अवस्थेत रोलर कोस्टर बंद पडल्याने हे सर्वजण आहे ते स्थितीत अडकून पडले. हा संपूर्ण प्रकार रविवारी फॉरोस्ट काउंटी फेस्टीव्हलदरम्यान विस्कॉन्सिंन येथील कॅडन येथे घडला.


व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा


खाली डोक वर पाय या अवस्थेत हे लोक 3 तास अडकून होते अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. अडकलेल्यांमध्ये 7 लहान मुलं आणि 8 व्यक्तींचा समावेश होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हवेत उलट्या अवस्थेत लटकलेले हे 15 लोक दिसत आहेत. हा व्हिडीओ 43 सेकंदांचा आहे. अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 



तांत्रिक गोंधळामुळे घडला प्रकार


3 तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर अग्निशामन दलाच्या जवानांना या अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करता आली. हे लोक उलट्या अवस्थेत अडकल्याने त्यांची सुटका करण्यासाठी अधिक वेळ लागला. मुलांना 3 तासांनी खाली उतरवण्यात आलं तेव्हा ती फार घाबरलेली होते. तांत्रिक गोंधळामुळे रोलर कोस्टर अडकल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी नेमकं काय घडलं याचा तपास सुरु करण्यात आला आहे.