`असा` तयार झाला रॉयल वेडिंंगचा केक !
ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल आज विवाहबंधनात अडकणार आहेत.
ब्रिटन : ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल आज विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही लग्नसोहळ्याबद्दल जगभरात आकर्षण आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या खास वेडिंग ड्रेसपासून त्यांच्या लग्नात सहभागी होणार्या मंडळींबाबत अनेक गोष्टींकडे लोकांचे लक्ष लागले आहे. या विवाहसोहळ्यातील खास आकर्षण असलेली एक गोष्ट म्हणजे 'वेडिंग केक'..
पहा कसा असेल 'वेडिंग केक'
प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचा केक हा एल्डरफ्लावर सिरपमध्ये मुरवलेला आहे. लेमन स्पंजने हा केक बनवला आहे. सोबतच यावर लेमन कर्ड आणि स्विस मेरिंग एल्डरफ्लावर बटरक्रीम लावण्यात आले आहे. हा बनवतानाचा खास व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लंडनच्या वायोलेट बेकरी क्लेअर पॅकने हा केक बनवला आहे.
शाही विवाहसोहळ्यातील ६०० पाहुण्यांना आमंत्रण असेल. त्यानुसार या केकची किंमत सुमारे ४२२८ डॉलर म्हणजेच सुमारे २ लाख ८७ हजार रुपये इतकी आहे. हा केक सजवण्यासाठी खरी फुलं वापरली जाणार आहेत.
प्रिंस हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम आणि केटच्या विवाहसोहळ्यात ८ थरांचा केक तयार करण्यात आला होता.