Rs 98000 Crore Firm Woman CEO Salary Rs 10.9 crore Per Month: भारतीय वंशाचे अनेक लोक परदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांचं नेतृत्व करत आहेत. अगदी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई असो किंवा मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला असो, भारतीयांचा दबदबा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहज दिसून येतो. केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच नाही तर औषध, उद्योग, राजकारणाबरोबरच अनेक क्षेत्रांमध्ये परदेशामध्ये भारतीयांचं वजन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यापैकी अनेकांना सुंदर पिचाई, सत्या नाडेला किंवा राजकारणाबद्दल बोलतायचं झाल्यास ऋषी सुनक वगैरेसारख्या नेत्यांची नाव ठाऊक आहेत. मात्र आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत जी तिच्या क्षेत्रामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध असली तरी भारतीयांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही.


कोण आहे ही महिला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या महिलेबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे रेवती अडवैथी. रेवती या पूर्वीची फ्लेक्सट्रॉनिक्स आणि सध्या फ्लेक्स नावाने अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्या एसटीईएममध्ये कार्यालयीन ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या समस्या मांडणाऱ्या प्रमुख नेतृत्वापैकी एक आहे. रेवती यांनी 2019 साली फ्लेक्स कंपनीमध्ये रुजू होण्याआधी एईटोण आणि हनीवेलसारख्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे.


फ्लोअर सुपरवायझर म्हणून सुरु केलं काम


रेवती यांनी बिर्ला इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अण्ड सायन्समधून इंजिनिअरिंगमध्ये बॅचर्लची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्या 2005 साली थंडरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण करुन उत्तीर्ण झाल्या. रेवती यांनी एईटोणमधून आपल्या प्रोफेश्नल करियरला सुरुवात केली. त्या ओक्लाहोमा येथील कार्यालयामध्ये फ्लोअर सुपरवायझर म्हणून रुझू झाल्या होत्या.


पुन्हा जुन्या कंपनीत परतल्या आणि 10 वर्ष काम केलं


त्यानंतर रेवती यांनी हनीवेलमध्ये 6 वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केलं. यामध्ये प्रोडक्शनपासून ते लॉजिस्टीकपर्यंत अनेक विभागांमध्ये त्यांनी काम केलं. त्या 2002 ते 2008 दरम्यान या कंपनीत कामाला होत्या. त्यानंतर त्या पुन्हा 2008 साली एईटोणमध्ये रुजू झाल्या आणि त्यांनी पुढील 10 वर्ष या कंपनीमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलं. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना या कंपनीच्या सीओओ पदावर नियुक्त करण्यात आलं.



पदभार स्वीकारल्यावर केले हे बदल


नवीन जनरेशमधील तंत्रज्ञान, उत्पादन आणि वितरण व्यवस्था यासारख्या गोष्टींचा विचार करुन रेवती यांनी फेब्रुवारी 2019 साली फ्लेक्स कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांनी या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी खांद्यावर घेतली. फ्लेक्सचा प्राथमिक उद्योग हा कंत्राटावर उत्पादन निर्मिती करण्याचा असला तरी रेवती यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने एण्ड टू एण्ड क्लायंटवर केंद्रीत करुन पुरवठा साखळीची मालकी मिळवण्यास सुरुवात केली.


आई गृहिणी तर बाबा केमिकल इंजिनअर


रेवती यांच्या व्यवस्थापनासंदर्भातील कामाची पद्धत ही सौम्य पण वेगवान निर्णय घेण्याची असल्याचं सांगितलं जातं. विविधता, सर्वसमावेक्षकता, दिर्घकालीन दृष्टीकोन यासारख्या गोष्टींचा प्रभाव रेवती यांच्या व्यवस्थापनामध्ये प्राकर्षाने जाणवतो. रेवती यांच्या आई विसालम स्वामी या गृहिणी आहेत तर त्यांचे वडील ए. एन. एन. स्वामी हे केमिकल इंजिनियर आहेत. चेन्नईमध्ये वास्तव्यास येण्यापूर्वी रेवती यांचं कुटुंब बिहार, गुजरात आणि आसाममध्येही काही काळ वास्तव्यास होतं.


एकूण पगार किती?


रेवती यांचा एकूण पगार हा 1 कोटी 59 लाख 79 हजार 41 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 131 कोटी रुपये इतका आहे. ही आकडेवारी त्यांच्या फ्लेक्स कंपनीच्या 2022 च्या अहवालामधून समोर आली आहे. म्हणजेच रेवती या महिन्याला 10.9 कोटी रुपये कमवतात. म्हणजेच त्यांचा एका दिवसाचा सरासरी पगार हा 36 लाख 33 हजार रुपये इतका आहे. रेवती यांची एकूण संपत्ती प्रसारमाध्यमांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 36 ते 54.5 मिलियन अमेरिकी डॉलर्सदरम्यान आहे.