Russia Ukrain War : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच काळ्या समुद्रात रशियन युद्धनौका 'मोस्कवा'ला जलसमाधी मिळाल्यावर रशिया अधिकच चवताळली आहे. युक्रेन कोणत्याही स्थितीत शरण येत नाही हे पाहून रशियाने हल्ले तीव्र केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता अण्वस्त्रांच्या वापराचा धोका निर्माण झालाय. जगाने रशियाच्या आण्विक हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज राहावं असा इशारा झेलेन्स्की यांनी दिलाय. 


रशिया युक्रेनवर आण्विक हल्ला करू शकते. त्यासाठी आपल्याला तयारी करायला हवी, रेडिएशन रोखणाऱ्या शेल्टर्सची गरज आहे. जगाने अँटी रेडिएशन मेडिसीनचा स्टॉक करायला हवा, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. 


रशियाने याआधीच आपली न्यूक्लिअर वॉर ड्रील केली आहेत. रशियाने अण्वस्त्र दलं सज्ज आहेत. युक्रेनविरोधात रशियाला अजून यश आलेलं नाही. त्यामुळे आता लाज राखण्यासाठी रशिया विध्वंसक अशा अण्वस्त्रांचा वापर करण्याची भीती आहे. 


अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनाही तिसऱ्या महायुद्धाची भीती सतावतेय. त्यामुळे जगात अण्वस्त्रांचा धोका कायम आहे. त्यातच झेलेन्स्की यांच्या इशाऱ्याने जगाची काळजी वाढवलीय.