Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचं नाव घेत नाही. चार महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरु असून ते बंद होण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना आता आपल्या प्रियजनांची जास्त काळजी वाटू लागली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील वधारले आहेत. त्यामुळे रशियन लोकांनी ज्योतिष्यांकडे धाव घेतल्याचं दिसत आहे. रशियन लोकांचा विश्वास ज्योतिषी आणि ग्रह, नक्षत्रांवर वाढत चालला आहे. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात रशियाचे आघाडीचे शोध इंजिन यांडेक्सवर "ज्योतिषी" साठी शोधांची संख्या दुप्पट झाली. कंपनीच्या कीवर्ड डेटानुसार, 19 फेब्रुवारीला हा शब्द 42,900 वेळा शोधला गेला, तर 5 मार्चला 95,000 हून अधिक लोकांनी तिथे हा शब्द शोधला. रशियन लोक त्यांच्या प्रियजनांच्या आरोग्याशी संबंधित अधिक प्रश्न विचारत आहेत. गर्दी वाढल्याने ज्योतिषीही आश्चर्यचकित झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषी एलेना कोरोलिओवा यांच्याकडे लोकं वेगवेगळे प्रश्न घेऊन येत आहेत. 63 वर्षीय एलेना यांनी सांगितले की, "लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की रशियाचे काय होईल? कधीपर्यंत जनजीवन सुरळीत होईल. काही लोकांना आपलं भविष्य म्हणजेच करिअरची चिंता आहे. तर शाळा कॉलेज कधी सुरु होणार याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत."


कोरोलिओवा यांनी ससांगितले की, बहुतेक जण हे युद्ध किती काळ चालेल? सुरक्षित राहू की नाही? देशाची आर्थिक स्थिती ठीक असेल की नाही? देश लवकरच या संकटावर मात करेल आणि विजयी होईल का? असे प्रश्न बहुतेक लोकांना पडले आहेत. कोरोलिओवा यांनी सांगितले की "सप्टेंबरमध्ये जागतिक संकट वाढेल, परंतु रशिया त्यातून स्थिर आणि समृद्ध होईल." त्या जातकांना मार्गदर्शन करण्यासाठी 5,000 रूबल (7132 रुपये) आकारतात.


युक्रेनमधील लोकही ज्योतिषांकडे धाव घेत आहेत. एका युक्रेनियन ज्योतिषाने दावा केला आहे की, त्याने काही दिवसांपूर्वी अनेक मंत्री, बँकर्स आणि अगदी युक्रेनच्या गुप्त सेवा सदस्यांना सल्ला दिला होता. युक्रेनियन मीडियामध्ये लोकप्रिय असलेले ज्योतिषी व्लाड रॉस यांनी सांगितले की, "पुतिन गंभीर आजारी आहेत आणि मार्च 2023 पर्यंत त्यांचा मृत्यू होईल."