बाल्टिक राष्ट्रांकडून 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी
Russia Ukraine War : युरोपमधील बाल्टिक राष्ट्रांनी 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
लंडन : Russia Ukraine War : युरोपमधील बाल्टिक राष्ट्रांनी 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीये. एस्टोनिया, लाटलिया, लिथुआनिया या तीन देशांनी रशियाच्या युक्रेनमधील आक्रमणाचा निषेध लाटवियाने 3, एस्टोनियाने 3 आणि लिथुआनियाने 4 रशियान राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. (Baltic Nations Expel 10 Russian Diplomats)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झाला आहे. पुतीन यांची वक्रदृष्टी पूर्व युरोवर पडण्याची शक्यता आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्यानेच हा पुतीन यांचा गेमप्लॅन उघड केला आहे. नाटोने लॅतव्हिया, इस्टोनिया, लिथुआनिया या देशांत मोठा युद्धाभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे पुतीन नाटोला शह देण्यासाठी या तीन देशांवर हल्ला करू शकतात, असे कोरोटचेंको यांनी म्हटले आहे.
युक्रेननंतर पुतीन यांचं पुढले लक्ष्य हे बाल्टिक देश असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच नाटोचा सदस्य असलेले हे देश सावध झाले असून त्यांनी आतापासूनच रशियाविरोधात पावलं उचलायला सुरूवात केली आहे.
युक्रेनला गुडघे टेकायला लावण्यासाठी....
रशिया युक्रेन युद्धात कोणताही निकाल दिसत नाहीये. त्यामुळे आता धोका वाढला आहे. युद्धाचा निकाल लावण्यासाठी रशियाकडून आता अतिविनाशकारी अस्त्रांचा वापर होण्याची भीती आहे. युक्रेन- रशिया युद्ध लांबतच चालले आहे. रशियन फौजा जंग जंग पछाडत आहेत पण त्यांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे आता रशिया विनाशकारी अस्त्रांचा वापर करण्याची भीती वाढली आहे. रशियाने याआधीच व्हॅक्युम ब़ॉम्ब, फॉस्फरस बॉम्बचा मारा युक्रेनवर केला आहे. युक्रेनला गुडघे टेकायला लावण्यासाठी रशिया अण्वस्त्रांचा माराही करण्याची भीती आहे. युक्रेनला अडकवण्यासाठीही रशिया या अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता पश्चिमी देशांना आहे.