नवी दिल्ली : रशियन फौजा युक्रेनमध्ये शिरल्यापासून युक्रेनच्या आण्विक प्रकल्पांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जगप्रसिद्ध चर्नोबिल अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर आता रशियन फौजांनी झापोरिझ्झ्या ही अणुभट्टी ताब्यात घेतल्याचं युक्रेनने म्हटलंय. काय आहे रशियाचा एन प्लॅन.. त्याबद्दल माहिती घेऊ.



जगाला चर्नोबिलपेक्षा दहापट धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण युरोपात सध्या कमालीची अस्वस्थता आहे. रशियानचं एक चुकीचं पाऊल आणि युरोप बेचिराख. रशियन सेनेनं युक्रेनचा झापोरिझ्झ्या या अणुऊर्जा प्रकल्पावर कब्जा मिळवलाय. युरोपातला हा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प. चर्नोबिलहून दहा पट मोठा. 1986 चा चर्नोबिल अपघात अजूनही जग विसरलेलं नाही. तर दसपट मोठ्या झापोरिझ्झ्यामधून रेडिएशन झालं तर जगात मानवी संहाराची त्सुनामीच येईल. रशियाने झापोरिझ्झ्या ताब्यात घेतल्याचा व्हिडिओच झेलेन्स्की यांनी जारी केलाय. 



युक्रेनचे अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात 


युक्रेनमधील 15 पैकी 5 अणुऊर्जा प्रकल्पांवर संकट आहे. झापोरिझ्झ्या, युझनोक्रेन्स्क, खेमेल्नाईत्स्की आणि रिवने या प्रकल्पांवर संध्या टांगती तलवार आहे. रशियनं मिसाईल्स या प्रकल्पांना धोका पोहोचवून जग नष्ट करू शकतात.


जगावर रेडिएशनचं संकट 


झापोरिझ्झ्याच्या युनिट नंबर 1 मध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. रिएक्टर युनिट्स असलेल्या भागातही रशियाने बॉम्बफेक केलीय. या प्रकल्पात 6 रिअॅक्टर्स आहेत. त्यापैकी पहिला रिअॅक्टर पूर्ण उद्ध्वस्त झालाय. तर दुसरा आणि तिसरा डिसकनेक्ट केलाय. तिथल्या आण्विक इंधनाला थंड केलं जातंय. या प्रकल्पातला युनिट नंबर 4 सध्या सुरू आहे. यातून 690 मेगावॉट वीज तयार होत आहे. युनिट 5 आणि 6 ही बंद करून थंड केली जात आहेत. 


यामुळे मात्र जगात खळबळ माजलीय. तातडीने जो बायडन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इंग्लंडने तातडीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे. जगभरातल्या न्यूक्लिअर एजन्सीज सध्या हाय अलर्टवर आहेत.


तब्बल 40 लाख घरांसाठी 5700 मेगावॉट वीज निर्मिती करणा-या या प्रकल्पात गडबड झाली तर मात्र हाच प्रकल्प संपूर्ण जगाचा कर्दनकाळ बनण्याची भीती आहे. युक्रेनमध्ये एकूण 15 आण्विक प्रकल्प आहेत. त्यामुळे या युद्धामुळे जग कोणत्या संकटात आहे याची कल्पना येईल.